Category सिंधुदुर्ग

दशावतार लोककलेतून वन्यजीव संरक्षणाचा संदेश; कुडाळ वनपरिक्षेत्रात सप्ताह उत्साहात!

पाच शाळांमध्ये वन्यजीव संरक्षणासाठी वनविभागाचा अनोखा उपक्रम ‘अधिवासांना जोडणे, वन्यजीवांना समृद्ध करणे’ संकल्पनेवर भर कुडाळ : निसर्ग, पर्यावरण आणि वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने संपूर्ण सावंतवाडी वनविभाग कुडाळ वनपरिक्षेत्रात  २ ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘वन्यजीव सप्ताह २०२६’…

ओरोस येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी; जलसंवर्धनासाठी पुढाकार!

ओरोस : प्रतिनिधी      मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओरोस येथे हॉटेल गंगाईसमोरील नाल्यावर दत्ता दळवी व संतोष कदम यांच्या सौजन्याने आज वनराई बंधारा बांधण्यात आला. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, संतोष कदम,…

पाणीटंचाईच्या बैठकीला आमदारांना वेळ नसेल तर मुंबईतील त्यांच्या निवासस्थानीच बैठक घ्या; माजी आम.वैभव नाईकांचा टोला

आ.निलेश राणेंच्या अनुपस्थितीमुळे मालवणमधील पाणीटंचाईच्या सलग दोन दिवस बैठका रद्द सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      मालवण तालुक्यातील पाणी टंचाईचा कृती आराखडा तयार करण्यासाठी मालवण तहसीलदार यांनी दोन वेळा आमदार निलेश राणेंची वेळ घेऊन आढावा बैठक आयोजित केली होती. मात्र सलग दोन्ही दिवशी…

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवती पोलिसांचे जलसंवर्धनासाठी श्रमदान!

खवणे भूतकोंडवाडीत श्रमदानातून कच्चा बंधारा ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ मोहिमेत पोलीस, ग्रामस्थांचा सहभाग कुडाळ : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘पाणी आडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा’ मोहिमेअंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील खवणे येथील भूतकोंडवाडीत श्रमदानातून कच्चा बंधारा बांधण्यात आला.      निवती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी…

धावत्या एसटी बसमधून धुराचे लोट; प्रवाशांमध्ये घबराट!

मालवण मार्गावरील कुपेरीच्या घाटीत थरार मालवण : महेश कदम      वेंगुर्ला येथून मालवणच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसमधून अचानक धुराचे लोट निघाल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या घटनेत गाडीला आग लागल्याच्या भीतीने एका तरुणीने धावत्या बस मधल्या खिडकीतून थेट बाहेर उडी मारल्याची…

संकटात साथ! संजय सावंतांच्या मदतीला धावले गॅरेज व्यावसायिक बांधव!

कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनकडून आर्थिक मदत आगीत गॅरेजचे झाले होते मोठे नुकसान कुडाळ : अचानक लागलेल्या आगीत गॅरेजमधील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कुडाळ शहरातील संजय सावंत यांच्या मदतीला कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन…

वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; शिवम म्हाडेश्वर यांच्याकडून कुडाळमध्ये कापडी पिशव्यांचे वाटप!

‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’ अभियानाला दिले पाठबळ कुडाळ : वाढदिवस म्हटला की जल्लोष, केक आणि मित्रमंडळींची गर्दी, असे चित्र पाहायला मिळते. मात्र, कुडाळ शहरातील युवा उद्योजक शिवम म्हाडेश्वर गेल्या अनेक वर्षांपासून वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड देत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. यंदाही…

लोकसहभागातून काळसे येथे नाल्यातील गाळ काढण्याचे काम!

नाना पाटेकर यांच्या कार्याला कृतीतून श्रद्धांजली जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या सहभागातून जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील काळसे येथे नैसर्गिक झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याचे संवर्धन व त्याचा सुयोग्य वापर करण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून नाल्यातील गाळ काढण्याचे श्रमदान…

भातशेती नुकसानीचे पंचनामे १० ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करा!

जि.प.कृषी समिती सभेत सभापती दादा साईल यांचे निर्देश सिंधुदुर्ग : जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती गंभीर बनली असताना नुकसानीच्या पंचनाम्यांना संथ गती असल्याने जि.प. कृषी समितीच्या बैठकीत कृषी समिती सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज प्रशासनाला धारेवर…

कमिशनच्या आमिषाने बँक खाते दिले; कुडाळातील तिघे गुजरात पोलिसांच्या ताब्यात!

संशयास्पद व्यवहारांचा तपास; कुडाळमध्ये खळबळ बँक खाते अनोळखी व्यक्तीला देऊ नका; पोलिसांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी        कमिशनच्या आमिषापोटी स्वतःचे बँक खाते अनोळखी व्यक्तींना वापरण्यास दिल्याने कुडाळ तालुक्यातील एका फर्मच्या तीन संचालकांना गुजरात पोलिसांनी नाट्यमयरित्या ताब्यात घेतले. या खात्यांमधून काही संशयास्पद…

error: Content is protected !!