ठळक घडामोडी

दशावतार लोककलेतून वन्यजीव संरक्षणाचा संदेश; कुडाळ वनपरिक्षेत्रात सप्ताह उत्साहात!

पाच शाळांमध्ये वन्यजीव संरक्षणासाठी वनविभागाचा अनोखा उपक्रम

‘अधिवासांना जोडणे, वन्यजीवांना समृद्ध करणे’ संकल्पनेवर भर

कुडाळ : निसर्ग, पर्यावरण आणि वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने संपूर्ण सावंतवाडी वनविभाग कुडाळ वनपरिक्षेत्रात  २ ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘वन्यजीव सप्ताह २०२६’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावर्षीच्या वन्यजीव सप्ताहाची अधिकृत मुख्य थीम “Connecting Habitats, Thriving Wildlife” (अधिवासांना जोडणे आणि वन्यजीवांना समृद्ध करणे) अशी घोषित करण्यात आली होती.
       श्री हेरंब पारंपारिक दशावतार लोककला नाट्यमंडळ सिंधुदुर्ग आणि वनक्षेत्रपाल कुडाळ यांचे सयुंक्त रित्या वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष नाटक सादरीकरण करून वन्यजीव सप्ताह उत्साहात व वेगळया पारंपरिक लोककलेचा माधमातून चौके,कुडाळ, पाट, वेंगुर्ला, माणगाव येथील पाच शाळांमध्ये साजरा करण्यात आला.
        कार्यक्रमसाठी मा उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिश शर्मा सर, सहायक वनसंरक्षक सुनील लाड सर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम कुडाळ परिक्षेत्रातील सर्व वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांचे उपस्थित उत्साहात साजरा करण्यात आला.

error: Content is protected !!