
खवणे भूतकोंडवाडीत श्रमदानातून कच्चा बंधारा
‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ मोहिमेत पोलीस, ग्रामस्थांचा सहभाग
कुडाळ : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘पाणी आडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा’ मोहिमेअंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील खवणे येथील भूतकोंडवाडीत श्रमदानातून कच्चा बंधारा बांधण्यात आला.
निवती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भीमसेन गायकवाड, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, खवणे ग्रामपंचायत सदस्य अविनाश खोत, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला. पावसाचे पाणी अडवून त्याचे जमिनीत पुनर्भरण करण्यासह जलसंवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.








