
ओरोस : प्रतिनिधी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओरोस येथे हॉटेल गंगाईसमोरील नाल्यावर दत्ता दळवी व संतोष कदम यांच्या सौजन्याने आज वनराई बंधारा बांधण्यात आला. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, संतोष कदम, विष्णू दळवी, सूर्यकांत पाटील तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.








