Category सिंधुदुर्ग

आकेरीत चालत्या टेम्पो ट्रॅव्हलरवर झाड कोसळले; चालक जखमी!

मोठा अनर्थ टळला; टेम्पो ट्रॅव्हलरमधील प्रवासी बालंबाल बचावले कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ – सावंतवाडी मार्गावरील आकेरी – उंचवळा परिसरात चालत्या टेम्पो ट्रॅव्हलरवर रस्त्यालगतचे धोकादायक स्थितीत असलेले आकेशियाचे मोठे झाड अचानक कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत…

सिंधुदुर्गनगरीजवळ एलसीबीची मोठी कारवाई; १.८०० किलोची खवले मांजराची खवले जप्त!

सांबराची दोन शिंगे, दोन दुचाकींसह ९२ लाखाचा मुद्देमाल जप्त रानबांबुळी येथे एलसीबी पथकाची कारवाई; चार जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी        स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत धडक कारवाई करत तब्बल ९२ लाख रुपये किंमतीची दुर्मिळ खवले…

आंब्रड पंचक्रोशीतील वीज समस्या सोडविण्यासाठी महावितरण अ‍ॅक्शन मोडवर!

ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींसह वीज ग्राहक संघटनेच्या पाठपुराव्याने यंत्रणा लागली कामाला कणकवलीवरून वीजपुरवठा सुरू; नवीन ट्रान्सफॉर्मर व पोल उभारले कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील आंब्रड पंचक्रोशीतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महावितरणाच्या विविध समस्यांवर अखेर तोडगा निघू लागला असून, विभागीय भाजप पदाधिकारी व…

आवळेगावात ‘गोकृपा अमृतम’चे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन!

रासायनिक खतांना पर्याय! जीवाणू संवर्धनाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण ‘गोकृपा अमृतम’मुळे जमिनीची सुपीकता वाढणार; कृषी विभागाचा उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी     रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय व शाश्वत शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने, तालुक्यातील आवळेगाव येथे कृषि विभागाच्या वतीने शेतकर्‍यांसाठी ‘गोकृपा अमृतम’ या…

पालकमंत्री नितेश राणे 29 मे पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित कणकवली : प्रतिनिधी    राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शुक्रवार 29 व शनिवार 30 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना…

महावितरणच्या कारभाराविरोधात कणकवलीत ‘गरमागरम चाय पे चर्चा’चे आयोजन!

१ लाख ७५ हजारांहून अधिक वीज ग्राहकांचा एल्गार कणकवलीत महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरणार; वीज ग्राहक संघटनेची माहीती कणकवली : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या वीज समस्यांमुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांनी आता थेट महावितरण अधिकाऱ्यांनाच जाब विचारण्याचा निर्धार केला असून, सिंधुदुर्ग जिल्हा…

वायंगणी समुद्रकिनारी कांदळवन नष्ट करून,भराव टाकत अनधिकृतपणे रस्ता केलेल्या परप्रांतीयांवर कडक कारवाई करा!

माजी आम.वैभव नाईक व वायंगणी येथील मच्छिमारांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला पंचनामा;कारवाई न झाल्यास वैभव नाईक यांचा आंदोलनाचा इशारा वेंगुर्ले : प्रतिनिधी          वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी बागायतवाडी येथे समुद्रकिनारी परप्रांतीयांनी जमीन खरेदी करून त्या जमिनीच्या ठिकाणी जाण्यासाठी तेथील…

शिवापूर मधील २५ ज्येष्ठ नाट्य कलाकारांचा गौरव!

मुंबईच्या स्मित-दत्त फाउंडेशनतर्फे कलाकार सन्मान सोहळा ‘भावसंगम’ काव्यसंग्रह प्रकाशनाने शिवापूर पंचक्रोशीत आनंदोत्सव कुडाळ : प्रतिनिधी          रंगभूमी आणि नाट्य क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या आणि आपल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कुडाळ तालुक्यातील शिवापूर येथील २५ ज्येष्ठ नाट्य कलाकारांचा ‘स्मित-दत्त फाउंडेशन,…

सिंधुदुर्गात पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी प्रशासन सतर्क!

जिल्ह्यात ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा; ५२ पेट्रोल पंप रितसर सुरू कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाईचा प्रशासनाचा इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क असून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील…

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कुडाळात ठाकरे शिवसेनेचे जोरदार आंदोलन!

वैभव नाईक हातात सायकल घेऊन उतरले रस्त्यावर; सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल महागाई, इंधन तुटवडा आणि NEET पेपरफुटीवरून सरकारवर टीका कुडाळ : प्रतिनिधी         पेट्रोल – डिझेल दरवाढीविरोधात बुधवारी कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या…

error: Content is protected !!