जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतले ‘सिंधुदुर्गचा राजा’चे मनोभावे दर्शन!

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने कुडाळ येथे साकारलेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची विधिवत पूजा करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुख-समृद्धी आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. …








