

कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे आमदार निलेश राणे यांनी दर्शन घेतले. विविध ठिकाणी भेटी देत त्यांनी गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
कुडाळ शहरातील विविध भागांत कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन आमदार निलेश राणे यांनी श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर तालुक्यातील ग्रामीण भागातही त्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.
युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांच्या वालावल येथील निवासस्थानी आमदार निलेश राणे यांनी भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, साईराज दळवी यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









