Category राजकीय

मुंबई भाजप-शिंदेंकडे गेली तर महाराष्ट्रापासून वेगळी होण्याचा धोका – वैभव नाईक

मुंबईत वैभव नाईकांचा जोरदार प्रचार; सभा, मशाल रॅली, डोअर-टू-डोअर संपर्क मुंबई : प्रतिनिधी     मुंबईत भाजप आणि शिंदे गटाच्या ताब्यात सत्ता गेल्यास महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून मुंबई वाचविण्याची शेवटची संधी प्रत्येक मुंबई वासीयांच्या हातात आहे.…

मालवण पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या दीपक पाटकर यांची बिनविरोध निवड!

स्वीकृत नगरसेवक म्हणून महेश कांदळगावकर, रविकिरण तोरसकर यांची वर्णी मालवण : प्रतिनिधी     मालवण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे शिंदे शिवसेनेचे दीपक पाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून माजी नगराध्यक्ष…

गीतेश राऊत यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तम जाण  – वैभव नाईक

सांताक्रूझ येथे काॅर्नर प्रचार सभा मुंबई : प्रतिनिधी     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कधीही जाती-धर्माचे राजकारण केले नसून मुंबईतील मराठी माणसाचा बुलंद आवाज बनण्याचे काम नेहमीच केले आहे. सत्ताधाऱ्यांकडून मुंबईवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सातत्याने संघर्ष केला आहे. शिवसैनिक आणि मनसैनिक हे…

सांताक्रूझ (पू) येथील ठाकरे शिवसेना उमेदवार सौ. श्रवरी परब यांच्या प्रचारात वैभव नाईक सहभागी!

हि निवडणूक फक्त मुंबईची नाही तर महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्मितेची निवडणूक – वैभव नाईक मुंबई : प्रतिनिधी      मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील सांताक्रूझ (पूर्व) या प्रभाग क्र. ८८ च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष युतीच्या उमेदवार…

मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरे शिवसेना युतीच्या प्रचारात माजी आमदार वैभव नाईक झाले सहभागी!

प्रभाग ५ व ९३ मध्ये प्रचारफेरी आणि डोअर टू डोअर संपर्क; उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सुजाता पाटेकर व रोहिणी कांबळे यांच्या प्रचारार्थ वैभव नाईक यांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी मुंबई : प्रतिनिधी       मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे…

मुंबईत ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार सुजाता पाटेकर यांच्या प्रचारात माजी आमदार वैभव नाईक सहभागी!

प्रभाग क्र. ५ मध्ये मतदारांच्या गाठीभेटी; सुजाता पाटेकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन मुंबई : प्रतिनिधी     मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या उमेदवार सौ. सुजाता उदेश पाटेकर…

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतली खा. नारायण राणेंची भेट

मालवण : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मंगळवारी दुपारी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांची घेतली. खा.राणे यांच्या मालवण येथील निलरत्न निवासस्थानी प्रा.शिंदे यांनी हि भेट घेतली. यावेळी खा. राणे…

राणेंना संपवायचे स्वप्न पाहणाऱ्यांना मी पुरून उरलोय – खा. नारायण राणे

राणे विरुद्ध राणे कधीच होणार नाहीत; राणे एकसंधच राहतील – कणकवलीत गर्जना कणकवली : प्रतिनिधी      जे राणेंना संपवायचं स्वप्न पाहत आहेत, त्यांना मी पुरून उरलो आहे. माझ्या रामेश्वराचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत मला कोणीही संपवू शकत नाही, असा स्पष्ट आणि ठाम…

सिंधुदुर्गात खासदार नारायण राणे यांचे जल्लोषात स्वागत; राणे समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

थोड्याच वेळात महारॅली कणकवलीत होणार दाखल सभेत खासदार नारायण राणे काय बोलणार याकडे लागले सर्वांचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा येथे रविवारी सायंकाळी राणे समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत खासदार नारायण राणे यांचे जल्लोषी स्वागत केले. नगरपंचायत निवडणुकीनंतर खासदार…

खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह!

पत्रादेवी ते बांदा दोन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा बांद्याहून कणकवलीकडे महारॅलीस कार्यकर्ते आणि ताफा सज्ज सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे हजारो समर्थक कार्यकर्ते आणि वाहनांचा भव्य ताफा सज्ज झाला आहे. पत्रादेवी ते…

error: Content is protected !!