ठळक घडामोडी

खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह!

पत्रादेवी ते बांदा दोन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा

बांद्याहून कणकवलीकडे महारॅलीस कार्यकर्ते आणि ताफा सज्ज

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
      खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे हजारो समर्थक कार्यकर्ते आणि वाहनांचा भव्य ताफा सज्ज झाला आहे. पत्रादेवी ते बांदा या मार्गावर तब्बल दोन किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. काही वेळातच खासदार नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत आगमन होणार असून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर बांदा येथून कणकवलीच्या दिशेने महारॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग असून वाहनांवर भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे झेंडे लावण्यात आले आहेत. या रॅलीत पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, सौ. नीलमताई राणे यांच्यासह व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!