ठळक घडामोडी

सिंधुदुर्गात खासदार नारायण राणे यांचे जल्लोषात स्वागत; राणे समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

थोड्याच वेळात महारॅली कणकवलीत होणार दाखल

सभेत खासदार नारायण राणे काय बोलणार याकडे लागले सर्वांचे लक्ष

कुडाळ : प्रतिनिधी
     सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा येथे रविवारी सायंकाळी राणे समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत खासदार नारायण राणे यांचे जल्लोषी स्वागत केले. नगरपंचायत निवडणुकीनंतर खासदार नारायण राणे प्रथमच सिंधुदुर्गात दाखल झाले असून, त्यांच्या स्वागतासाठी भाजपा व शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागतानंतर पत्रादेवी – बांदा येथून कणकवलीच्या दिशेने हजारो वाहनांसह रॅली मार्गस्थ झाली. या रॅलीमुळे दरम्यान  “एकच नारा” अशा आशयाचे बॅनर, भाजप आणि शिवसेना पक्षाचे झेंडे आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. या शक्तीप्रदर्शनात पालकमंत्री तथा मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. थोड्याच वेळात महारॅली कणकवली येथे दाखल होणार असून तेथे आयोजित जाहीर सभेत खासदार नारायण राणे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या सभेकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!