ठळक घडामोडी

मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरे शिवसेना युतीच्या प्रचारात माजी आमदार वैभव नाईक झाले सहभागी!

प्रभाग ५ व ९३ मध्ये प्रचारफेरी आणि डोअर टू डोअर संपर्क; उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन

सुजाता पाटेकर व रोहिणी कांबळे यांच्या प्रचारार्थ वैभव नाईक यांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी

मुंबई : प्रतिनिधी
       मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कुडाळ–मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मुंबईत सक्रिय सहभाग घेतला. विविध प्रभागांमध्ये प्रचारफेरी, मतदारांच्या गाठीभेटी व डोअर टू डोअर संपर्क साधत त्यांनी युतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.
     मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या उमेदवार सौ. सुजाता उदेश पाटेकर यांच्या प्रचारफेरीत माजी आमदार वैभव नाईक सहभागी झाले होते. बुधवारी झालेल्या या प्रचारादरम्यान त्यांनी प्रभागातील विविध भागांत मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत सौ. सुजाता पाटेकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी दहिसर मागाठणेचे विभागप्रमुख, माजी नगरसेवक उदेश पाटेकर, मालवणचे नगरसेवक मंदार ओरसकर यांच्यासह मुंबईतील ठाकरे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       तसेच, वांद्रे (पूर्व) गांधीनगर येथील प्रभाग क्रमांक ९३ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या उमेदवार सौ. रोहिणी योगेश कांबळे यांच्या प्रचारानिमित्त आज माजी आमदार वैभव नाईक यांनी डोअर टू डोअर मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. मतदार नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी सौ. रोहिणी कांबळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. या प्रचारादरम्यान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मुंबईतील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला मुंबईत मिळणारा सकारात्मक प्रतिसाद हा विजयाच्या दिशेने नेणारा असल्याचा विश्वास यावेळी वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!