ठळक घडामोडी

मुंबईत ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार सुजाता पाटेकर यांच्या प्रचारात माजी आमदार वैभव नाईक सहभागी!

प्रभाग क्र. ५ मध्ये मतदारांच्या गाठीभेटी; सुजाता पाटेकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी
     मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या उमेदवार सौ. सुजाता उदेश पाटेकर यांच्या प्रचारफेरीत कुडाळ–मालवणचे माजी आमदार वैभव नाईक सहभागी झाले होते. बुधवारी झालेल्या या प्रचारफेरीदरम्यान वैभव नाईक यांनी प्रभागातील विविध भागांत मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या.
     यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत विकासकामांचा आढावा मांडला तसेच सौ. सुजाता पाटेकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन वैभव नाईक यांनी मतदारांना केले. या प्रचारफेरीत दहिसर मागाठणे येथील विभागप्रमुख, माजी नगरसेवक उदेश पाटेकर, मालवणचे नगरसेवक मंदार ओरसकर यांच्यासह मुंबईतील ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारादरम्यान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे चित्र दिसून आल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.

error: Content is protected !!