मालवण तारकर्लीतील एमटीडीसी कार्यालयाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

मालवण : प्रतिनिधी मालवण) तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कार्यालयाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. काही क्षणातच आगीने रौद्र रुप धारण करत संपूर्ण कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. …






