ठळक घडामोडी

मुंबई – गोवा महामार्गावर जानवली येथे अपघात!

कार – मोटरसायकल यांच्यात धडक

कणकवली : प्रतिनिधी
      मुंबई गोवा महामार्गावर कणकवली नजिक जानवली येथे कार आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. यात मोटरसायकलस्वाराला दुखापत झाली असून आज दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहीती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी नागरीकांचीही गर्दी झाली होती.

error: Content is protected !!