मुंबई – गोवा महामार्गावर टेंबधुरीनगर येथे अपघात
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी टेंबधुरी नगर येथे आज सकाळी ९.४५ च्या सुमारास झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात ६२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. रस्ता ओलांडत असताना एका भरधाव कारने त्यांना धडक दिल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, तेथीलच पादचारी महीला महामार्ग ओलांडत होत्या. त्याचवेळी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मारुती सुझुकी XL6 कारने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर पादचारी महीलेला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.









