ठळक घडामोडी

देवबाग समुद्रात पर्यटकांची नौका वाऱ्यामुळे पलटी; मोठी दुर्घटना टळली

पॅरासेलिंग नौकांमुळे पर्यटकांचे प्राण वाचले

नौका सफरीदरम्यान देवबाग खाडी संगमाजवळ दुर्घटना

मालवण : प्रतिनिधी
     नौका सफर करून पुन्हा किनारी माघारी परतणाऱ्या पर्यटकांची एक नौका वाऱ्यामुळे पलटी झाल्याची घटना देवबाग समुद्र किनारी घडली. दैव बलवत्तर म्हणून या होडीतील आठही जणांना वाचविण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टाळली आहे. ही घटना आज सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली.
     आज दुपारी सात – आठ पर्यटकांनी भरलेली एक नौका ही  सफर करण्यासाठी देवबागच्या समुद्रात गेली होती. सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास ती किनाऱ्याकडे माघारी येत असताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे देवबाग खाडी संगमाजवळ  पाण्यात पलटी झाली. त्यामुळे नौकेमधील सर्व पर्यटक पाण्यात फेकले गेले. याच वेळी पॅरासेलिंग च्या दोन नौका जवळून जात असताना त्यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यातील एकाने पाण्यात पडलेल्या सर्वांना आपल्या नौकेत घेऊन किनारा गाठल्याने ते सुदैवाने बचावले. तर दुसऱ्या एका पॅरासेलिंग करणाऱ्या नौकेने दुर्घटनाग्रस्त नौकेला खाडी किनारी आणले. या घटनेची कुठेही नोंद नव्हती.

error: Content is protected !!