ठळक घडामोडी

मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथे कारला अपघात!

सुदैवाने कारचालक बचावला : कारचे मोठे नुकसान

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
     मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस येथे भरधाव इनोव्हा कारचा अपघात झाला असून यामध्ये चालकाला दुखापत झाली आहे. त्याला जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास झाला.
     मिळालेल्या माहितीनुसार, सदर कार ही कणकवली हून गोव्याच्या दिशेने जात होती. यावेळी कारमध्ये चालक एकटाच होता. सदर कार भरधाव वेगात असताना ती डाव्या दुभाजकावर आदळून विरुद्ध कणकवलीच्या दिशेने जाऊन पलटी झाली.  यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असून काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची तीव्रता पाहता कार चालक सुदैवाने बालंबाल बचावला. याबाबत अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करीत आहेत. महामार्ग वाहतूक शाखेच्या पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती.

error: Content is protected !!