वेंगुर्ले : प्रतिनिधी
अजित दादांचे जाणे आमच्या मनाला अजूनही पटत नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रावर मोठा आघात झाला आहे. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाचे अतीव दुःख प्रत्येक कार्यकर्त्याला झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्र हेच त्यांचे कुटुंब आहे. सामान्यातला सामान्य आमच्या सारखा कार्यकर्ता त्यांना सहज भेटत होता. त्यांच्याकडे कोणतेही काम घेवून गेल्यावर ते काम होत होतं. आमच एक स्लोगन होतं ‘अजित दादा एकच वादा’. कारण त्यांनी एकदा वादा केला की त्याला कोणीही थांबवू शकत नव्हतं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्यावर फार मोठं दुःख कोसळल आहे. आज अनेक नेते झाले, होतील परंतु अजित दादांसारखा नेता पुन्हा होणे नाही. कारण त्यांचं जे व्यक्तिमत्व होत, कर्तृत्व होत ते असामान्यातील सामान्य होते. त्यांच अपघाती निधनाने राज्यात निर्माण झालेली पोकळी भरून न येणारी आहे. आज आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांसमोर अनेक प्रश्न आहेत कि आता मंत्रालयात जायचं कोणाकडे, मंत्रालयात आपल्या भावना मांडायच्या कोणाकडे, या कोकणाच्या समस्या मांडायच्या कोणाकडे. आतापर्यंत कोकणातील जे जे प्रश्न आम्ही त्यांच्याकडे मांडले ते सर्व त्यांनी सोडविले. त्यांच्या निधनाने कोकणासह राज्याचे मोठे नुकसान झाले. अजित दादांच्या जाण्याने आम्ही सर्व पोरके झालो आहोत. त्यांना आमची भावपूर्ण आदरांजली.
– एम.के. गावडे
ज्येष्ठ नेते – राष्ट्रवादी काँग्रेस







