पावशीतील सखी मतदान केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून शनिवारी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३७.७२ टक्के मतदान झाले आहे.
आतापर्यंत झालेल्या मतदानामध्ये स्त्री मतदार २०,६८८, तर पुरुष मतदार २३,३०६ इतके मतदान झाले आहे. यामध्ये एकूण ४३,९९४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, पावशी ढवणवाडी येथील सखी मतदान केंद्राला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी सकाळी भेट देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील उपस्थित होते. सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे सुरळीतपणे पार पडत आहे. ग्रामीण भागात मतदारांचा उत्साह दिसून येत आहे.









