ठळक घडामोडी

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी सिंधुदुर्गातील हिंदुत्वनिष्ठांचे दिल्लीकडे प्रस्थान!

कणकवली : प्रतिनिधी

     ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’च्या प्रस्तुतीत आणि सनातन संस्थेच्या आयोजनात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा  सोहळा दि. १३ व १४ डिसेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला आहे. सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हा महोत्सव एक महत्त्वपूर्ण पर्व ठरणार आहे.

    या महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सनातन संस्थेचे साधक, हिंदू धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शनिवारी मोपा (गोवा) येथून विमानाने नवी दिल्लीकडे प्रस्थान केले. यावेळी ‘सनातन राष्ट्र’चा जयघोष करत उपस्थितांनी उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. हिंदुत्वनिष्ठांनी दिलेल्या घोषणांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले गेले. अनेक प्रवाशांनी कुतूहलाने या महोत्सवाची माहिती जाणून घेत शुभेच्छा दिल्या.दिल्ली येथे होणाऱ्या या महोत्सवाला देशभरातील अनेक संत-महंत, मान्यवर तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दिल्लीकडे रवाना झालेल्या मान्यवरांमध्ये मालवण येथील अधिवक्ता समीर गव्हाणकर, अधिवक्ता हेमेंद्र गोवेकर, अधिवक्ता गिरीश गिरकर, अधिवक्ता अविनाश पाटकर, अधिवक्ता पलाश चव्हाण, कुडाळ येथील हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, बांदा येथील शिवराम देसाई व प्रदीप देसाई यांचा समावेश आहे. तसेच माणगाव येथील श्री दत्त मंदिर न्यासाचे अध्यक्ष सुभाष भिसे व सचिव दीपक साधले हेही या शिष्टमंडळात सहभागी झाले आहेत.

error: Content is protected !!