ठळक घडामोडी

निवती रॉक येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण!

निर्मनुष्य बेटांवर ध्वजारोहण उपक्रमात निवती पोलिसांचा सहभाग

कुडाळ : प्रतिनिधी
     शासनाच्या आदेशान्वये निर्मनुष्य बेटांवर ध्वजारोहण या उपक्रमांतर्गत ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निवती पोलीस ठाण्यामार्फत निवती रॉक येथे ध्वजारोहण करण्यात आले. या उपक्रमात निवती मेढा गावातील सुमारे ६० ते ६५ मच्छिमार बोटी सहभागी होऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली.
     ध्वजारोहणाचा मान निवती मेढा गावातील मच्छिमार श्रीधर मेतर यांना देण्यात आला. यावेळी निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी ध्वजाला सलामी दिली. या कार्यक्रमास कोस्ट गार्ड, फिशरीज व मेरीटाईन विभागाचे अधिकारी तसेच निवती मेढा गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!