ठळक घडामोडी

कुडाळ तालुक्यात महायुतीचा विजय; कार्यकर्त्यांकडून जल्लोष

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ तालुक्यात नऊ जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेनेचे पाच तर भाजपाला दोन जागांवर विजय मिळालेला आहे. एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. या यशानंतर कुडाळ मध्ये महायुतीने जल्लोष साजरा केला.
    घावनळे जि प मतदार संघात केशव उर्फ दीपक नारकर (शिवसेना), माणगाव मध्ये  रुपेश कानडे (शिवसेना), पावशीमध्ये तुकाराम उर्फ दादा साईल (शिवसेना), तेंडोलीमध्ये  आरती पाटील (भाजप), पिंगुळीत  गंगाराम सडवेलकर (उबाठा), नेरुर मध्ये रुपेश पावसकर (अपक्ष), आंब्रड दीपलक्ष्मी पडते (शिवसेना), ओरोस मध्ये सुप्रिया वालावलकर (भाजप), वेताळबांबर्डे नागेश आईर (शिवसेना) विजयी झाले आहेत.
दरम्यान कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या  ९ गटातून शिवसेना पाच, भाजप २,  उबाठा एक तर अपक्ष एका जागेवर विजयी झाले आहेत.
       कुडाळ पचायत समिती विजयी उमेदवार!
आंब्रड मध्ये नितीन महाडेश्वर (भाजप),  पिंगुळी ममता राऊळ (उबाठा), साळगाव मध्ये मिलिंद नाईक (शिवसेना),  कसाल संतोष कांदळकर (उबाठा),  डिगसमध्ये  निखिल कांदळगावकर (शिवसेना), माणगाव योगेश धुरी (उबाठा), झाराप मधून सिताराम तेली (भाजप), जांभवडेतुन बाळकृष्ण मढव (शिवसेना), आवळेगावमध्ये श्रावणी तेरसे (भाजप), वेताळ बांबर्डे मध्ये अश्विनी सावंत (शिवसेना), ओरोस मधून अमित भोगले (भाजप), पावशी करुणा पावसकर (भाजप), नेरुर उत्तर मधून दीप्ती नाईक (उबाठा),  नेरुर दक्षिण मधून अर्चना बंगे (उबाठा),  तेंडोली मंगेश प्रभू (भाजप), घावनळेतुन अर्चना घावनळकर (भाजप), पाट मध्ये  प्रियांका दळवी (शिवसेना), गोठोस मधून दिव्यांगी खरात (शिवसेना) हे उमेदवार पंचायत समिती साठी निवडून आले आहेत. भाजप ७, शिवसेना ६ तर उबाठा  ५ जागांवर विजयी झाले आहेत. ठाकरे शिवसेनेने आपल्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करीत जल्लोष केला.

error: Content is protected !!