ठळक घडामोडी

कोकण किनारपट्टीवर सिगल पक्ष्यांचे आगमन!

देवगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर निसर्गरम्य दृश्य

देवगड : प्रतिनिधी
       कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या सिगल पक्ष्यांनी हजेरी लावल्याने किनारपट्टी निसर्गसौंदर्याने अधिकच खुलून दिसत आहे. सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील मुणगे–आडवळवाडी समुद्रकिनाऱ्यावर सिगल पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येत असून, त्यांच्या आगमनाने किनारा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.
     दरवर्षी थंडीच्या हंगामात रशिया व उत्तर युरोपातील बर्फाच्छादित प्रदेशातून सुमारे पाच ते सहा हजार किलोमीटरचा प्रदीर्घ प्रवास करून हे सिगल पक्षी कोकण किनारपट्टीवर येतात. समुद्रावर तरंगत उडणारी पांढरी पाखरे, किनाऱ्यावर विसावलेले थवे आणि निळ्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर उमटणारे हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने देवगडच्या समुद्रकिनाऱ्यांकडे आकर्षित होत आहेत. विशेषतः निसर्गप्रेमी व छायाचित्रकारांसाठी सिगल पक्ष्यांचे आगमन पर्वणी ठरत असून, सकाळी व संध्याकाळी या पक्ष्यांचे मनमोहक दर्शन घडत आहे. सिगल पक्ष्यांच्या आगमनाने देवगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाला चैतन्य मिळाले असून कोकणचा निसर्ग पुन्हा एकदा पर्यटकांना खुणावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

error: Content is protected !!