कुडाळ : प्रतिनिधी
“झाले बहू, होतील बहू; परंतु महाराष्ट्राचा एकच ‘दादा’ अजित पवार,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. अजितदादांच्या अपघाती निधनाने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील कोट्यवधी जनतेला प्रचंड वेदना झाल्या असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
चांदा ते बांदा नव्हे देशाच्या पूर्व पश्चिम राजकारण आणि समाजकारण क्षितिजात शुक्र तार्याप्रमाणे लोकशाही दिशा दर्शविणारा एकच लोकाभिमुख नेता शत्रू-मित्र परिवारात घर करून वावरणारा ‘बारामती’ चा पवार कुटुंबियांनी अर्पित केलेला ‘अजित दादा एकच वादा’, त्यांचे विमान अपघाती निधन ही पार्श्वभूमी सारा महाराष्ट्रच नाही, तर देशाच्या कोट्यवधी जनतेस यातना देणारी गोष्ट आहे.
मुंबई ते बारामती विमान प्रवासात तेही त्यांच्या बारामतीत विमान लँडिंगवर येताच स्फोट होतो, ही गोष्टच वेदनादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांच्या पुरोगामीत्वावर विश्वास असणार्या सर्वांच्या ‘दादा’ ची प्राण ज्योत मालवावी चटका देणारी स्थिती आहे. अपघाताची पार्श्वभूमी शोधून काढली जावी कारण उच्चपदस्थ नेतृत्व ज्या वाहनाने प्रवास करणाची त्याची काय स्थिती होती हा प्रश्न सातत्याने भेडसावणारा आहे. बारामतीच्या पवार कुटुंबियांनी राजकारण नि समाजकारणांची नाळ सोडलेली नाही. कृषी, उदयोग, शिक्षण या क्षेत्रात फार मोठे योगदार गेली 60 वर्षे देताना दिसते. राज्यकर्ते कोण या पेक्षा तळासाळातील जनतेच्या ‘दादां’चे अपघाती निधन याबाबत वास्तव जनतेला समजले पाहिजे. आज राजकारणात वर्तनाचे अनेक कंगोरे दृष्टीपती येतात, ही बाब चिंताग्रस्त करणारी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर अणावकर म्हटले आहे.









