ठळक घडामोडी

मालवण येथे उद्या गाबीत समाजातील लोकप्रतिनिधींचा सत्कार!

मालवण : प्रतिनिधी
     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सन २०२५- २६ च्या नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या गाबीत समाजातील नगराध्यक्ष, नगरसेवक, जि. प. व पं. स. सदस्य यांचा गाबीत समाज सिंधुदुर्ग संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार समारंभ दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११  वाजता संस्कार हॉल, धुरीवाडा – मालवण येथे संपन्न होणार आहे.
     या सत्कार कार्यक्रमास निवडून आलेल्या गाबीत बांधव व भगिनी तसेच समाज बांधवानी उपस्थित रहावे, असे आवाहन गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, सरचिटणीस महेंद्र पराडकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!