ठळक घडामोडी

राज्य–केंद्रात सरकार आपले, आता जि.प.-पं.स.ही महायुतीचीच हवी – आ. निलेश राणे

पावशी जि.प. मतदारसंघात आमदार निलेश राणेंचा झंझावाती प्रचार दौरा

सोनवडे, पावशी, डिगस मध्ये बैठकांचा धडाका

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ–मालवणचे शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातील सोनवडे, पावशी, पणदूर व डिगस या गावांमध्ये झंझावाती प्रचार दौरा केला. राज्य व केंद्रात महायुतीचे सरकार असताना जिल्हा परिषद व पंचायत समितीतही महायुतीचेच सदस्य असले पाहिजेत, असा निर्धार करत सर्वांनी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
     जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदार संघातील सोनवडे, पावशी, पणदूर, डिगस या गावांमध्ये रविवारी प्रचार दौरे केले. यावेळी त्यांनी खळा बैठका घेतल्या. या बैठकांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, निरीक्षक अरुण सावंत, ओबीसी सेलचे श्रीधर पेडणेकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, जिल्हा सचिव तथा पावशी मतदारसंघाचे उमेदवार दादा साईल, पावशी पंचायत समिती मतदार संघाच्या उमेदवार करुणा पावसकर, डिगस पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार निखिल कांदळगावकर, सोनवडे सरपंच योगिता धुरी, उपसरपंच नाजुका सावंत, माजी सभापती अभय परब, माजी सरपंच बाबल धुरी नागेश परब, सुधीर धुरी, पावशी सरपंच वैशाली पावसकर, पावशी माजी सरपंच श्रीपाद तवटे, रामदास तेंडुलकर, विनायक अणावकर, डिगस माजी सरपंच नित्यानंद कांदळगावकर, रमेश घोगळे, अरुण सावंत, शेखर गोसावी, धोंडी सुर्वे, विजय लुडबे, नंदकिशोर पवार, अमर घाडी, आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!