जुन्या आठवणींना उजाळा; २००० बॅचचा रौप्य महोत्सव साजरा
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा येथील एकनाथ ठाकूर सभागृहात नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. क.म.शि.प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
या वेळी माजी प्राचार्य महादेव कानशिडे, माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा ॲड. निलांगी रांगणेकर, उपाध्यक्ष उद्योजक चंद्रकांत कदम, खजिनदार सीए. सौ. जयंती कुलकर्णी, सचिव प्रा. अरुण मर्गज, सीए. सुनील सौदागर, उद्योजक अजीत राणे, संविता आश्रमचे संदीप परब, भूपतसेन सावंत, नोटरी ॲड. अमोल सामंत, प्रा. डॉ. अनंत लोखंडे, प्रा. डॉ. व्ही. जी. भास्कर यांच्यासह विविध क्षेत्रांतील माजी विद्यार्थी उपस्थित होते.
माजी प्राचार्य महादेव कानशिडे यांचा सत्कार करण्यात आला. ॲड. निलांगी रांगणेकर, सीए. जयंती कुलकर्णी, सीए. सुनील सौदागर, भूपतसेन सावंत, तसेच माजी विद्यार्थिनी रुपाली कशाळीकर, शिल्पा शिरोडकर, दिव्या बांदेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
२००० बॅचचा रौप्य महोत्सव केक कापून साजरा करण्यात आला.क.म.शि.प्र.मंडळाचे संस्था पदाधिकारी, सरकार्यवाह अनंत वैद्य, सहकार्यवाह महेंद्र गवस, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांचे मार्गदर्शन, मेळाव्याच्या पूर्वनियोजनामध्ये माजी विद्यार्थी संघाचे विशेष सहाय्य, सचिव प्रा.अरुण मर्गज, तसेच अध्यक्षा निलांगी रांगणेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत कदम, सीए.सौ.जयंती कुलकर्णी, राजू(श्रीहरी) बक्षी, रत्नाकर जोशी आणि निलेश जोशी आदींनी वेळोवेळी महाविद्यालयाला दिलेल्या भेटी, या सर्वांमुळे हा मेळावा सुनियोजित पडला. माजी विद्यार्थी मेळावा आयोजन समितीच्या समन्वयक म्हणून प्रा. काजल मातोंडकर यांनी काम पाहिले. प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी प्रास्ताविक करून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष वालावलकर यांनी केले, मान्यवर परिचय डॉ. रवींद्र ठाकुर यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन कॅप्टन डॉ. एस. टी. आवटे यांनी केले.









