ठळक घडामोडी

दोडामार्गात एसटी व दुचाकी यांच्यात अपघात

दोडामार्ग : प्रतिनिधी
     दोडामार्ग तालुक्यातील केळीचे टेंब येथे मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकी यांच्यात धडक बसून अपघात झाला. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एसटी बसला दुचाकीने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
       या अपघातात दुचाकीस्वाराच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित मार्गस्थ नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत रुग्णवाहिकेला पाचारण केले व जखमीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत अपघाताचा पंचनामा केला. एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

error: Content is protected !!