
शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – कृषी विभागाचे आवाहन
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील अमृत सभागृह, ग्रामपंचायत रानबांबुळी येथे आज शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याच्या लाभ वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, पंचायत समिती सदस्य अमित भोगले, तंत्र अधिकारी मनीषा पाटील, तालुका कृषी अधिकारी (कुडाळ) भास्कर चौगले, मंडळ कृषी अधिकारी तानाजी सगरे, उपकृषी अधिकारी श्रद्धा वाडेकर, ग्रामपंचायत अधिकारी मनमोहन धुरी, सहाय्यक कृषी अधिकारी प्रिया खरवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सविस्तर माहिती देत पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर व पंचायत समिती सदस्य अमित भोगले यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगले यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सुदेश राणे यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित शेतकऱ्यांची सद्यस्थिती संगणकीय पद्धतीने तपासून त्यांच्या अडचणींचे निराकरण केले. कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी प्रिया खरवडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अनन्या म्हसकर, नूतन बोभाटे, हिंदळेकर आणि भरत परब यांनी केले.








