ठळक घडामोडी

कुडाळ तालुक्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४७.४५ टक्के मतदान

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६

कुडाळ : प्रतिनिधी
      जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कुडाळ तालुक्यात आज शनिवार सकाळपासून मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू असून दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४७.४५ टक्के मतदान झाले आहे. मतदारांमध्ये सकाळपासूनच मतदानासाठी चांगली गर्दी पाहायला मिळत आहे.
     तालुक्यातील एकूण ५५ हजार ३४४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये २६ हजार २७१ महिला मतदार तर २९ हजार ७३ पुरुष मतदारांचा समावेश आहे. शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडत असून प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. सायंकाळी मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असून मतदारांमध्ये लोकशाही उत्सवाचा उत्साह दिसून येत आहे.

error: Content is protected !!