ठळक घडामोडी

कुडाळ येथे २० डिसेंबर रोजी श्री संत गाडगे महाराजांची ६९ वी पुण्यतिथी कार्यक्रम!

कुडाळ : प्रतिनिधी
    कुडाळ – लक्ष्मीवाडी येथे श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ, कुडाळ यांच्या वतीने श्री संत गाडगे महाराज यांची ६९ वी पुण्यतिथी शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. तेथील नागेश उर्फ तात्या कुडाळकर यांच्या निवासस्थाना नजिक हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
    या निमित्त सकाळी ७ ते ८.३० या वेळेत लक्ष्मीवाडी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता श्री संत गाडगे महाराजांच्या मूर्तीचे पूजन होणार असून या पूजनाचे यजमान सौ. व श्री. दर्शन कुडाळकर असतील. समाजबांधवांसाठी आयुष्यमान कार्ड काढण्याचे शिबिरही सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता आरती, तर ३ वाजता तीर्थप्रसाद होणार आहे. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सायंकाळी ७ वाजता ह. भ. प. विनायक बुवा आजगांवकर यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता मडवळवाडी मित्र मंडळ यांचे भजन सादर होणार आहे. यावेळी सर्व समाजबांधवांनी व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे कुडाळ तालुकाध्यक्ष सदानंद अणावकर व कार्यवाह गुरुदत्त कुडाळकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!