मालवण : महेश कदम
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अससोसिएशन आयोजित मानाच्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्य पद स्पर्धे मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्य संघातून मालवण नगर परिषद व्यायाम शाळेचा खेळाडू श्री गणेश हनुमंत सातार्डेकर याची 65 ते 70 किलो वजनी गटा मध्ये महाराष्ट्रातुन टॉप टेन मध्ये निवड होऊन आपल्या कौशल्यच्या जोरावर टॉप सिक्स मध्ये मानाचे स्थान पटकवत सहवा क्रमांक मिळविला. रोख रक्कम प्रमाणपत्र, चषक देऊन मान्यवर यांच्या हस्ते मालवणच्या खेळाडूचा गौरव करण्यात आला. 65 ते 70 किलो गट बॉडी बिल्डिंग सोबत याच गटातील क्लासिक फिजिक प्रकार मध्ये देखील टॉप टेन मध्ये स्थान पटकवत सातवा क्रमांक मिळविला. गणेश सातार्डेकर याची पुणे येथे दिनांक 28 ते 30 मार्च 2026 या मानाच्या भारत श्री स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड करण्यात आली आहे.
कुडाळ येथील एम्पायर जिमचा खेळाडू जयप्रकाश उर्फ बाळा नार्वेकर याची हि 70 किलो वजनी गटा मदर टॉप टेन मध्ये निवड झाली व मास्टर गट (40 वर्ष वरील )प्रकारात महाराष्ट्र संघतून निवड करण्यात आली
भारतातील मान्यता प्राप्त शासन मान्य संघटना मधून खेळली जाणारी हि मानाची स्पर्धा या मध्ये निवड झाल्या बद्दल खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.
गणेश याला प्रविण हिंदळेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. जयप्रकाश नार्वेकर यांना एम्पायर जिमचे प्रथमेश केळबाईकर यांचे मार्गदर्शन लाभले. सिंधुदुर्ग संघ व्यवस्थापक महेश परब मालवण यांनी काम पहिले. खेळाडूंची निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर अससोसिएशनच्या वतीने अध्यक्ष शंकर कांबळी, सचिव तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच किशोर शांताराम सोन्सूरकर यांनी विशेष अभिनंदन केले. मालवण मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने भविष्यात राज्य राष्ट्रीय स्पर्धा आयोजन करण्या बाबत राष्ट्रीय अध्यक्ष संजय मोरे यांना विनंती करण्यात आली.









