ठळक घडामोडी

तेंडोली जि.प. मतदारसंघात सुजाता गावडे यांची प्रचारात आघाडी!

गावागावात प्रचारफेरी; तेंडोलीत ठाकरे शिवसेना–काँग्रेसचा संयुक्त प्रचार वेगात


थेट मतदारसंवादाला प्रतिसाद; तेंडोलीत प्रचाराचा झंझावात

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ तालुक्यातील तेंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार सौ. सुजाता सचिन गावडे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. मतदारसंघातील गावागावात प्रचारफेरी काढत मतदारांशी थेट संवाद साधून प्रचारावर भर देण्यात येत आहे.
        तेंडोली पंचायत समिती मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विजय प्रभू यांनीही प्रचाराला वेग दिला असून, जि.प. उमेदवार सौ. सुजाता गावडे व पं.स. उमेदवार विजय प्रभू यांनी संयुक्तपणे प्रचारफेरी काढून ग्रामस्थ व मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या. या प्रचारफेरीला ग्रामस्थांचा व मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत असून, मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. थेट जनसंवाद व संघटित प्रचारामुळे तेंडोली मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार अधिक वेगाने पुढे जात असल्याचे चित्र आहे.

error: Content is protected !!