मालवणच्या साई पारकरचा कलाविष्कार; कलेतून व्यक्त केला विजयाचा आनंद
‘किंग संजू’ची तुफानी खेळी; भारताचा दिमाखदार विजय
मालवण : महेश कदम
टी २० विश्वचषक २०२६ च्या (T20 World Cup 2026) सुपर ८ सामन्यात वेस्टइंडीजविरुद्ध भारताच्या विजयाचे शिल्पकार संजू सॅमसन ठरले आहेत. १ मार्च २०२६ रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात सॅमसनने नाबाद ९७ धावांची तुफानी खेळी करत भारताला ५ विकेट्सनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
या ऐतिहासिक विजयानंतर सिंधुदुर्गातील मालवण बाजारपेठ येथील येथील तरुण चित्रकार साई पारकर याने अवघ्या काही मिनिटांत ‘किंग’ संजू सॅमसन याचे हुबेहूब चित्र रेखाटून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संजू सॅमसन याची हुबेहुब प्रतिकृती साई पारकरने रेखाटून आपल्या कलेतून या विजयाचा आनंद व्यक्त केला. या कलाकृतीबद्दल साईचे सर्वत्र कौतुक होत आहे.









