ठळक घडामोडी

आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी कुडाळ आगाराची विशेष बससेवा!

दिवसरात्र यात्रा स्पेशल बससेवा उपलब्ध; भाविकांच्या सेवेसाठी कुडाळ आगार सज्ज

९ व १० फेब्रुवारी रोजी कुडाळ आगाराच्या अन्य मार्गावरील ५१ बसफे-या राहणार बंद

कुडाळ : प्रतिनिधी
      मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी कुडाळ एसटी आगार सज्ज झाले आहे. आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी जाणा-या भाविकांच्या सेवेसाठी सोमवार दि. ९ व मंगळवार १० फेब्रुवारी २०२६ रोजी कुडाळ एसटी आगारातर्फे जादा बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी २४ एसटी बसेस तैनात करण्यात आल्या असून, सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजल्यापासून कुडाळ बसस्थानकासह कसाल, पांग्रड, निरूखे, पणदूर या भागातून दिवस रात्र ज्यादा आंगणेवाडी यात्रा स्पेशल बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुमारे ३८ हून अधिक बसफे-यांचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या जादा एस.टी. बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुडाळ एसटी आगार प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
     आंगणेवाडी जादा बससेवेचे प्रमुख मार्ग पुढीलप्रमाणे : कुडाळ–नेरूरपार–काळसे पेंडूरकट्टा–कुमामे–गोळवण–वडाचा पाट–मसदे–तिठा–बागायत–आंगणेवाडी, कसाल–हिवाळे–विरण–पोईप–मसदेतिठा–आंगणेवाडी, कसाल–खोटले–वायंगवडे–आंगणेवाडी, कसाल-हेदुळफाटा-खोटले-रवळनाथ मंदीर-वायंगवडे-धनगरवाडी-पोईप-मसदे स्कूल-बागायतमार्गे आंगणेवाडी, पांग्रड–कडावल–पणदूर–आंगणेवाडी,
निरूखे–कडावल–पणदूर–आंगणेवाडी,
पणदूर–ओरोस–आंगणेवाडी अशा आंगणेवाडी यात्रा स्पेशल बससेवा सोडण्यात येणार आहे.
        कुडाळ आगाराच्या या बसफे-या दोन दिवस राहणार बंद!
       आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त कुडाळ एसटी आगारातून ज्यादा बससेवा सोडण्यात येणार असल्याने सोमवार दि. ९ ते मंगळवार दि. १० फेब्रुवारी या कालावधीत कुडाळ आगाराच्या ५१ बसफे-या तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये विजापूर, बेळगांव, पणजी, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे या लांब पल्ल्याच्या बसफे-यांसह वेंगुर्ले, मालवण, सावंतवाडी, कणकवली, देवगड, खारेपाटण, या मार्गावरील बसफे-या बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील मसुरे, हुमरमळा, निळेली, कोरजाई, पांग्रड, तळगाव, कट्टा, वायंगवडे, केरवडे, मळई, मोरे, कुसगाव, केळूस आदी मार्गावरील बसफे-या तात्पुरत्या स्वरूपात दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. बुधवार दि. ११ फेब्रुवारीपासून कुडाळ आगाराची बससेवा पूर्ववत सुरू होणार असून, प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन एसटी आगार प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!