ठळक घडामोडी

कुडाळ येथे ‘दावत-ए-इफ्तार’ सोहळा उत्साहात; सर्वधर्मीय बांधवांची उपस्थिती!

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या उपक्रमाला मान्यवरांचा प्रतिसाद

सामाजिक सलोखा व बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा संदेश

कुडाळ : प्रतिनिधी
     सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांचेद्वारे, पवित्र होळी आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर, कुडाळ येथे “दावत-ए-इफ्तार” कार्यक्रमाचे” आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या सर्वधर्मीय सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदू, मुस्लीम, बौद्ध, ख्रिस्चन बांधवानी बहुसंखेने सामील होत कार्यक्रम यशस्वी केला.
       या प्रसंगी बोलताना सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन चे श्री. एजाज नाईक यांनी संस्थेचे आरोग्य विषयक कार्य आणि संस्था मस्जिद, मदरसा येथे आयोजित करत असलेल्या रक्तदान शिबिरांची माहिती दिली आणि पवित्र होळी आणि रमजान सणाच्या सर्वाना शुभेच्छा देत कार्यक्रमाचाउद्देश विषद केला.
    याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर, मनसे जिल्हाध्यक्ष श्री. धीरज परब, राष्ट्रीय कॉंग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष श्री. अभय शिरसाट, माजी जिल्हा परीषद सदस्य श्री. संजय भोगटे, राष्ट्रीय कॉंग्रेस चे जिल्हा पदाधिकारी तथा जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, संत राऊळ महाराज कॉलेज चे प्राध्यापक डॉ. अर्षद आवटे यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि समाजात प्रेम आणि आदरभाव वृद्धींगत व्हावा यासाठी सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन करत असलेल्या कार्याची नोंद सर्वजण घेतील आणि भविष्यात असे कार्यक्रम गावागावात होतील असे सुतोवाच केले. यावेळी बोलताना अभय शिरसाट, श्री. धीरज परब यांनी देखील  कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आणि कुडाळ मध्ये पुर्वम्पार असलेला धार्मिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी सर्व कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली, तसेच सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन द्वारे कोरोना काळात देखील आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराविषयी गौरवोद्गार काढले. कुडाळ नगर पंचायत चे नगरसेवक श्री. अभी गावडे, श्री. गणेश भोगटे, श्री. संतोष शिरसाट, यांनी देखील उपस्थित राहत कार्यक्रमाच्या नेटक्या आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.
     यावेळी डॉ. अल्फान आवटे, अॅड. श्री. परवेज नाईक, श्री. उल्हास शिरसाट, श्री. प्रकाश कुंटे, श्री. उल्हास बल्लाळ, श्री. सुनिल धुरी, माजी नगरसेवक श्री. सुनिल बांदेकर, श्री. राजू गवंडे, श्री. प्रसाद रेगे, श्री. जयंत रेगे, दै. सकाळ चे पत्रकार श्री. अजय सावंत, दै. पुढारी चे पत्रकार श्री.  काशीराम गायकवाड, दै. तरूण भारत चे छायाचित्रकार श्री. प्रसाद राणे, जयभीम युवक मंडळ चे अध्यक्ष श्री. विद्याधर कुडाळकर, भुषण कुडाळकर, विजय कुडाळकर, श्री. महेश तेंडोलकर, यांनी देखील उपस्थित राहत कार्यक्रमाचा उद्देश सफल होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन च्या कार्याचा गौरव केला.
     सिंधुदुर्ग मिल्लत फौंडेशन च्या कार्यकर्त्यानी कार्यक्रमाचे नेटके आयोजन करत सहभागी झालेल्या समाजबांधवांचा पाहुणचार केला. यावेळी  हाफिज नाझीम, श्री. मुश्ताक शेख, श्री. रेहान शेख, श्री. सज्जाद शेख, श्री. इकबाल मेमन, हाफिज जहेज शेख, श्री. आदिल शाह, श्री. इम्रान मुजावर, श्री. मोहसीन बागवान, श्री. जमीर पटेल, श्री. अनिक नाईक, श्री. अब्दूल हवालदार, श्री. माझीन नाईक, श्री. बशिरुद्दिन शेख, श्री. साजिद दोस्ती, श्री. नियाज शाह, श्री. अय्याज दोस्ती, श्री. आबू दोस्ती, श्री. मुस्तकीन बागवान, श्री. अनिस दोस्ती, श्री. मुबीन दोस्ती, श्री. मकसूद खान, श्री. आजीम मुजावर, श्री. शरफुद्दीन शेख, मेहबूब जमादार, शाहरूख चौधरी, रिझवान मणीयार, हुसेन मणीयार, समिर शेख, साद खान, जुबेर मणीयार, उमेर शेख, इलियास शेख, मुबारक नदाफ, उस्मान शेख, अरीफ जमादार, आदी बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!