ठळक घडामोडी

पाळये परिसरात हत्तींचा उपद्रव; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

शेतकरी भयभीत; वनविभागाकडून उपाययोजना करण्याची आग्रही मागणी

दोडामार्ग : प्रतिनिधी
    दोडामार्ग तालुक्यातील पाळये परिसरात पाच वन्य हत्तींच्या कळपाने धुडगूस घातला आहे. बुधवारी रात्री हत्तींनी शेतकरी गणपत दळवी यांच्या केळी, नारळ व सुपारीच्या बागायतीत शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. नारळाची झाडे मुळासकट उपटली गेली असून केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात व नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

error: Content is protected !!