ठळक घडामोडी

बीएलओचे काम करण्यास कुडाळ मधील प्राथ. शिक्षकांचा विरोध!

धरणे आंदोलन करीत वेधले तहसील प्रशासनाचे लक्ष

तर सिंधुदुर्ग जिल्हाभर आंदोलन करू : शिक्षक समितीचा प्रशासनाला इशारा

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची बीएलओ कामासाठी प्रशासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. या बीएलओ कामा विरोधात कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळच्या नेतृत्वाखाली एकवटत कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर मंगळवारी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत लाक्षणिक धरणे आंदोलन छेडत तहसीलदार प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी बीएलओचे काम करण्यास शिक्षकांनी कडाडून विरोध दर्शवला. आजपासूनच बीएलओचे काम करणे पूर्णपणे बंद करण्यात येत असून, प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत, या अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करावे, अन्यथा सिंधुदुर्ग जिल्हाभर आंदोलन उभारले जाईल असा इशारा प्राथमिक शिक्षक समितीने यावेळी प्रशासनाला दिला.
       ज्येष्ठ शिक्षक नेते चंद्रकांत अणावकर, राज्य सहसचिव राजन कोरगांवकर, राज्य कार्य. सदस्य दादा जांभवडेकर व सचिन मदने, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सचिव तुषार आरोसकर, कुडाळ तालुकाध्यक्ष शशांक आटक, तालुका सचिव महेश गावडे, माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, जिल्हा कार्य. सदस्य आपा सावंत, संतोष वारंग, तालुका नेते प्रसाद वारंग, स्वामी सावंत, श्रीकांत उगवेकर, अनंत राणे, संजना राऊळ, भार्गवी कापडी, सुगंधा अणावकर, सावली सुर्वे, गोपाळ गावडे, शैलेंद्र न्हावेलकर, शिवा चव्हाण आदींसह तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित शिक्षकांना संबोधीत केले. दरम्यान नायब तहसीलदार श्री.गवस व निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांनी आंदोनलस्थळी येऊन शिक्षक समितीचे निवेदन स्वीकारले. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूमही उपस्थित होते.

error: Content is protected !!