ठळक घडामोडी

वेताळ बांबर्डे पूलाजवळ भरधाव कारला अपघात!

मुंबई–गोवा महामार्गावर अपघातांची वाढती मालिका

अर्धवट महामार्ग कामाचा फटका; वेताळ बांबर्डेत कार रस्त्यालगत उलटली

कुडाळ : प्रतिनिधी
    मुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पूलाजवळ सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणा-या कारला मोठा अपघात झाला. भरधाव वेगात असलेली कार महामार्गालगत सखल भागात उलटली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही मात्र कारचे मोठे नुकसान झाले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.
       तेथील वळणावर महामार्गाच्या अर्धवट कामामुळे लेन अरूंद आहे. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. आज देखील मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असताना कारचालकाला महामार्गाचा अंदाज न आल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला जात सखल भागात जाऊन कोसळली. यात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले. जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार महामार्गावर घेण्यात आली.

error: Content is protected !!