कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या व्याधकार ग. म. तथा भैय्यासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय पत्रकार व छायाचित्रकार पुरस्कार तसेच कै. वसंत दळवी स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा आयोजन आज गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, एमआयडीसी – कुडाळ येथे संपन्न होणार असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा व त्यांच्या पाल्यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून आमदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर हे असणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून कुडाळच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिवलंत, पत्रकार परिषद सदस्य गणेश जेठे, कुडाळ तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम तसेच जिल्हा पत्रकार संघाचे सचिव दिलीप उर्फ बाळ खडपकर आदींसह देसाई व दळवी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्याला पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.









