ठळक घडामोडी

कुडाळमध्ये जि. प.-पं. स. निवडणुकीसाठी १५३ मतदान केंद्रांचे ईव्हीएम कमिशनिंग पूर्ण!

तहसील कार्यालयात ईव्हीएम मशीन सिलिंग प्रक्रिया

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आढावा

कुडाळ : प्रतिनिधी
        कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर एकूण १५३ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीन कमिशनिंगची (मतदान यंत्र सिलिंग) प्रक्रिया रविवारी कुडाळ तहसील कार्यालय येथे पूर्ण करण्यात आली. यासोबतच निवडणुकीसाठी राखीव स्वरूपात ७२ ईव्हीएम मशिन्स सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
     कुडाळ तहसील कार्यालयात ईव्हीएम कमिशनिंग कामकाजाची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे आणि उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांनी भेट देऊन आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील, नायब तहसीलदार संजय गवस, निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्यासह निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!