ठळक घडामोडी

मणेरीत शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

लहान मुले थोडक्यात बचावली; जीवितहानी टळली

दोडामार्ग : प्रतिनिधी
      दोडामार्ग तालुक्यातील मणेरी येथील निलेश कांबळे यांच्या घराला मंगळवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
      मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी निलेश कांबळे यांच्या पत्नी कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची लहान मुले घरात झोपलेली होती. अचानक घराला आग लागली. यावेळी लहान मुलांनी जीवाच्या भीतीने घराबाहेर धूम ठोकली. घरातून धूर येत असल्याचे शेजाऱ्यांना दिसतात त्यांनी धाव घेत आरडाओरडा केला. सुदैवाने दैव बलवत्तर असल्याने या लहान मुलांना कोणतीही इजा झाली नाही. या आगीत घरातील सर्व इलेक्ट्रिक उपकरणे जळून खाक झाली असून घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. या घटनेमुळे कांबळे कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!