ठळक घडामोडी

आंबेली येथे पर्यटकांची कारला मोठा अपघात!

पर्यटक सुखरूप, कारचे मोठे नुकसान

दोडामार्ग : प्रतिनिधी
     दोडामार्ग तालुक्यातील आंबेली येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास पर्यटकांची कार विरुद्ध दिशेने जात थेट रस्त्यालगतच्या घळणीत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने कारमधील सर्व पर्यटक सुखरूप असून, मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
     कर्नाटक राज्यातील काही पर्यटक गोव्याकडे जाण्यासाठी दोडामार्ग मार्गे प्रवास करत होते. दोडामार्ग ते वीजघर या राज्य मार्गावरील आंबेली परिसरात चालकाचा अंदाज चुकल्याने कार विरुद्ध दिशेने गेली आणि थेट रस्त्याच्या बाजूच्या घळणीत कोसळली. अपघातस्थळी माती असल्याने कार लगतच्या विद्युत खांबावर आदळण्यापासून थोडक्यात बचावली. मात्र, रस्त्यालगत लोंबकळणाऱ्या दूरसंचार निगमच्या तारांना कार लागल्याने त्या तुटल्या. सध्या आंबेली येथे एका मोरीचे काम सुरू असून, संबंधित ठेकेदाराने कोणतेही सूचना फलक किंवा इशारे लावले नसल्याने चालकास रस्त्याची योग्य माहिती मिळाली नाही. त्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप काही स्थानिकांनी केला आहे. तर काही नागरिकांनी चालकाला डुलकी आल्याने अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!