ठळक घडामोडी

कुंभारमाठ येथे घरफोडी; सोन्याचा हार लंपास

मालवण : प्रतिनिधी
       मालवण कुंभारमाठ येथील सागरी महामार्ग परिसरात अथनीकर कुटुंबियांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत ४५ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     याबाबत मुस्ताक शरफुद्दीन अथनीकर (५०, रा. कुंभारमाठ सागरी महामार्ग, मालवण) यांनी मालवण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार मुस्ताक अथनीकर हे दि. ९ फेब्रुवारी रोजी आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेसाठी कुटुंबासह रात्री ११ वा. सुमारास घराला कुलूप लावून गेले होते. १० फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वा. ते घरी परतल्यानंतर घराच्या हाँलमधील स्लायडिंग खिडकीची काच फोडलेली असल्याचे निदर्शनास आले. घरात प्रवेश केल्यानंतर किचनमधील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. बेडरूममधील पत्र्याच्या कपाटाचा लॉकर उचकटून फोडण्यात आले होते. तपासणी केली असता, कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेला १२ ग्रॅम वजनाचा अंदाजे ४५ हजार रु. किमतीचा सोन्याचा हार चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप खाडे करीत आहेत.

error: Content is protected !!