मालवण : प्रतिनिधी
भारतीय सुगम संगीत महाविद्यालयाच्या समर्थ शारदा सुगम संगीत संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या सुगम संगीत परीक्षेत मालवण स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी मालवण त्रिंबक येथील मानसी कांबळे (पूर्वाश्रमिची रेखा पवार) हिने यश संपादन केले आहे.
मालवण त्रिंबक येथील रेखा पवार यांनी मालवण स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या विवाहानंतर त्या मानसी कांबळे म्हणून सुपारीचीत आहेत आज त्या पोलीस दलात महिला पोलीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतीय सुगम संगीत महाविद्यालयाच्या समर्थ शारदा सुगम संगीत संस्थेतर्फे नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या सुगम संगीत परीक्षांचा निकाल जाहीर झाल्याची माहिती रत्नागिरी केंद्राच्या संचालिका डॉ. मंजिरी घोलकर यानी दिली.
गीत अलंकार पार्ट १ – मानसी कांबळे, मानसी फडके, गीत विशारद – मनाली जोगळेकर, गीत उपांत्य मेघा मोरे, प्राची ढवळीकर, डॉ. मुग्धा आपटे, स्वाती जोशी, गुरुदेव नांदगावकर. गीत मध्यमा – योगेश मुळ्ये, भारत सावंत, ज्योती सावंतदेसाई, त्रिशा पवार, अनुश्री रायकर.
गीत तृतीया – अंजली लिमये, श्रेयसी गांगण, मनीषा सारंगधर, रश्मी ठाकूर, सुनेत्रा तांबे, मंजिरी गुणे, दीपिका आठल्ये, पूजा तांबे. -गीत द्वितीया श्रद्धा जोशी, कश्मीरा सावंत, भाग्यश्री पावसकर, स्नेहा जोशी, उज्वला पवार, अलका भावे.
गीत प्रथमा – अक्षता कदम, माधवी कुलकर्णी, नरेंद्र घाडीगावकर, स्वरूपी किल्लेकर, रेणुका साळवी, डॉ. शुभांगी लांजेकर, डॉ. नेहा पाटील, स्नेहल मयेकर यांनी यश संपादन केले.







