ठळक घडामोडी

कुडाळात बँक कर्मचाऱ्यांची  निदर्शने…!

पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी…!

कणकवली : प्रतिनिधी
    पाच दिवसांचा आठवडा करावा या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन नेतृत्वाखाली बँकिंग क्षेत्रातील संघटनांनी कुडाळ येथे बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर बुधवारी निदर्शन केली.
      ८ मार्च २०२५ मध्ये झालेल्या बाराव्या द्विपक्षीय करारामध्ये पाच दिवसाचा आठवडा करावा अशी मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर जुलै २०२५ मध्ये वित्त मंत्रालयाकडून ही मागणी विचाराधीन असून लवकरात लवकर लागू केली जाईल असे सांगण्यात आले होते. वारंवार पाठपुरवठा करूनही सरकार जाणून-बुजून पाच दिवसांचा आठवडा करण्यास टाळाटाळ करत आहे. याविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन च्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रातील सर्व संघटना एकत्रितपणे लढा देत आहेत. त्या अनुषंगाने देशव्यापी आंदोलन छेडण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी कुडाळ बँक ऑफ इंडिया समोर निदर्शने करण्यात आली. या निदर्शनामध्ये बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया व युनियन बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. ही निदर्शने कॉम्रेड संतोष रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कॉम्रेड ऋषिकेश गावडे, कॉम्रेड निखिल साटम उपस्थित होते. पाच दिवसांच्या आठवडयासह इतर प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी अधिकारी व कर्मचाऱ्यांची  मागणी आहे.

error: Content is protected !!