ठळक घडामोडी

महापालिका निवडणुकांतील ऐतिहासिक यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन!

मुंबई : प्रतिनिधी
      मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील विविध महापालिकांवर भाजप–महायुतीने घवघवीत व ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय विजयाबद्दल आज राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेत अभिनंदन केले.
      या भेटीदरम्यान राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये जनतेने दिलेल्या भरभरून पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. भाजप–महायुतीच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास हा विकासाभिमुख कार्यपद्धतीची पोचपावती असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या ऐतिहासिक विजयामुळे राज्यातील राजकीय चित्र अधिक भक्कम झाले असून विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांच्यासह अन्य नेतेमंडळी उपस्थित होती.

error: Content is protected !!