ठळक घडामोडी

कुडाळ हायस्कूलच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाचे सुवर्णयश; राज्यस्तरावर कोल्हापूर विभागाचे नेतृत्व

आट्यापाट्या विभागीय स्पर्धेत कुडाळच्या मुलींची बाजी

१९ वर्षाखालील मुलींच्या संघालाही कांस्यपदक
कुडाळ : प्रतिनिधी
     क. म. शि. प्र. मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कुडाळच्या १४ वर्षाखालील मुलींच्या आट्यापाट्या संघाने विभागीय स्पर्धेत घवघवीत यश मिळवत संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा व रत्नागिरी या बलाढ्य संघांना पराभूत करत या संघाने सुवर्णपदक पटकावले असून, आता हा संघ कोल्हापूर विभागाचे राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करणार आहे.
    विजेत्या संघात कर्णधार लावण्या गावडे हिच्यासह जैलेशा तेजम, जुई चव्हाण, सुष्टी शेटकर, वैदवी कर्पे, स्वरा जाधव, शालिनी दळवी, वैभवी राणे, रोशनी कदम, दुर्वा देसाई, तनया घोगळे व चित्राली कुंभार यांचा समावेश आहे. अंतिम सामन्यात लावण्या गावडे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
दरम्यान, १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने कांस्यपदक मिळवले. या संघात कर्णधार तन्वी बांबूळकर हिच्यासह ज्योती चव्हाण, मैमोनिसा शहा, कार्तिका परब, मनस्वी पाटील, प्रीती बावकर, पूर्वा सावंत, नम्रता गोसावी, दुर्वा पाटील, दिव्या आगलावे, दिया परब व हर्षदा तेली यांचा समावेश होता. या संघाला उपांत्य फेरीत दिव्या आगलावे व मनस्वी पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
   या खेळाडूंना क्रीडा शिक्षक विजय मयेकर व रामचंद्र खाकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत धाराशिव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!