ठळक घडामोडी

कणकवलीत गारांसह अवकाळी पावसाची हजेरी!

रणरणत्या उन्हात अचानक पावसाची हजेरी

वातावरणात अचानक बदल

कणकवली : प्रतिनिधी
       मार्च महिन्यात उन्हाच्या झळा बसत असतानाच कणकवली शहर व परिसरात गुरुवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे या पावसासोबत गारांचाही वर्षाव झाल्याने वातावरणात अचानक बदल जाणवला.
     गुरुवारी सकाळपासूनच कणकवलीत प्रचंड उष्णता जाणवत होती. दुपारपर्यंत रणरणते ऊन पडले होते. मात्र दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास वातावरणात बदल होत ढगांची गर्दी झाली आणि गडगडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसासोबत गारा पडू लागल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. दिवसभराच्या उकाड्यानंतर झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

error: Content is protected !!