ठळक घडामोडी

सिंधुदुर्गातील कलाकार राम मेस्त्री यांचे कोल्हापूरला चित्रप्रदर्शन!

२७ डिसेंबर पर्यंत प्रदर्शन पाहण्यासाठी राहणार खुले

कुडाळ : प्रतिनिधी
      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे येथील सुपुत्र व पाट हायस्कूलचे माजी विद्यार्थी, उदयोन्मुख कलाकार राम मेस्त्री यांचे चित्रप्रदर्शन कोल्हापूर येथील शाहू स्मारक कलादालनात भरविण्यात आले असून, हे प्रदर्शन दिनांक २७ डिसेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.
      राम मेस्त्री यांचे प्राथमिक शिक्षण पाट हायस्कूल येथे झाले असून, त्यानंतर त्यांनी दळवीज आर्ट कॉलेज, कोल्हापूर येथे कला विषयात उच्च शिक्षण घेतले. विद्यार्थी दशेत असताना कलाशिक्षक संदीप साळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्हास्तरावर अनेक पुरस्कार पटकावले आहेत. राम मेस्त्री यांना त्यांच्या कलाकृतींसाठी प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशन, मुंबई यांचा प्रतिष्ठेचा पुरस्कार तसेच ‘विश्वरंग’ तिसरे राष्ट्रीय चित्रप्रदर्शन पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कला क्षेत्राचा गौरव वाढला असून, कला रसिकांकडून त्यांच्या चित्रप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

error: Content is protected !!